Home राहाता Ahmednagar: खा. सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Ahmednagar: खा. सुजय विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह

Ahmednagar MLA Sujay Vikhe Patil Corona Positive

Ahmednagar News Live | अहमदनगर:  अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणचे खा. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)  यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची त्यांनी स्वत: याबाबत  माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या टिवीट मध्ये म्हंटले आहे की, ‘आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,’ असं आवाहन सुजय विखे पाटलांनी केलं आहे.

दरम्यान गेल्या ३० डिसेंबरला राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांचे सुपूत्र आणि खासदार सुजय विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: Ahmednagar MLA Sujay Vikhe Patil Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here