Home Accident News Ahmednagar: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Ahmednagar: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

Ahmednagar Accident One killed in unidentified vehicle crash

Ahmednagar Accident | अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या जोराच्या धडकेत झालेल्या अपघातात रस्त्याने पायी जाणारा व्यक्ती गंभीर जखमी होय्न ठार झाल्याची घटना नगर पुणे महामार्गावर राजसाहाब वाईन्स या दुकानाजवळ झाला.

अशोक वाजे रा. सुडके मळा बालिकाश्रम रस्ता नगर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक वाजे हे रात्री साडे आठ वाजता नगर पुणे महामार्गाने राजसाहब वाईन्स या दुकानासमोरून पायी चालत येत होते. त्यावेळेस अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा आदिनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.  

Web Title: Ahmednagar Accident One killed in unidentified vehicle crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here