Home Accident News दुर्दैवी: कंटनेरने भररस्त्यात महिलेस चिरडले

दुर्दैवी: कंटनेरने भररस्त्यात महिलेस चिरडले

Kopargaon Accident woman was crushed by the container

Ahmednagar News Live | Kopargaon Accident | कोपरगाव: दोघे पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना तहान लागली म्हणून थांबले व पत्नी पाण्याची बाटली आणण्यासाठी गेली असता मात्र दुर्दैवाने ती रस्ता ओलांडत असतानाच भरधाव वेगात असलेल्या एका कंटनेरने तिला चिरडल्याची ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे चौफुली येथे घडली.

शकीलाबी नूर शहा (वय ५०, रा. तिडी,ता. वैजापुर) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहा पतीपत्नी आपल्या दुचाकीवरून वैजापूरकडून कोपरगावच्या दिशने जात होते. प्रवास करीत असतांना तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी ते थांबले. पाण्याची बाटली आणण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या (एमएच ४६ एएफ ७९०३) क्रमांकाच्या कंटेनरने त्यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला होता. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फरार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kopargaon Accident woman was crushed by the container

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here