Home अहमदनगर दोन तरुणांनी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

दोन तरुणांनी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण

Ahmednagar Two teenagers kidnap minor girl

Ahmednagar Rahuri | अहमदनगर:  नेवासा तालूक्यातील दोन तरूणांनी राहुरी तालुक्यातील केंदळ परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण (kidnap) केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी तालूक्यातील उंबरे परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहत आहे. दिनांक १० मार्च रोजी सकाळी राहुरी तालूक्यातील केंदळ येथून त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले.

अपहरण करणारे हे नेवासा तालूक्यातील आहेत. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एका आरोपीला फोन केला असता तेव्हा तो म्हणाला कि, तूला काय करायचे ते कर. मी घाबरत नाही. असे म्हणून त्याने मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. आरोपींनी अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीचे अपहरण केले. याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी विशाल भाउसाहेब काकडे व रितेश भाउसाहेब काकडे दोघे राहणार सोनई, ता. नेवासा या दोघांवर अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महादेव शिंदे हे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Two teenagers kidnap minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here