अकोले तालुक्यात करोनाचे अठरावे शतक पार, आंबड येथे उद्रेक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ४२ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १८ वे शतक पार करीत १८३० वर आकडा पोहोचला आहे. आंबड येथे करोनाचा उद्रेक झाला असून आज १३ बाधित आढळून आले आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालात रेडे येथील ५४ वर्षीय पुरुष, ४९,३० महिला, ६ वर्षीय मुलगा, अकोले येथे ३६,७५,५५,३५ वर्षीय पुरुष, शेरणखेल येथे ६६ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ९ वर्षीय मुलगी, २५ वर्षीय तरुणी, १ वर्षाचा बालक, गणोरे २७ वर्षीय पुरुष, आंबड येथे ५०,२१,४८,२,५८,३१,७,२९ वर्षीय पुरुष, २१,२४,५४,२७,२५ वर्षीय महिला, बदगी बेलापूर येथे ३६,६५ वर्षीय महिला, इंदोरी येथे ३२,११ वर्षीय पुरुष, बिबदारवाडी येथे ६२ वर्षीय महिला, ३९,७० वर्षीय पुरुष, शेरणखेल १६ वर्षीय महिला, कोतूळ येथे ४०,८८ वर्षीय पुरुष, बलठाण येथे ६५ वर्षीय महिला, ३ वर्षीय बालिका, देवठाण येथे ५५ वर्षीय महिला, ३०,६६ वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे १० वर्षीय बालक असे आज एकूण ४२ बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १८३० इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole 42 corona infected Ambad highest