Home अकोले अकोले: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोले: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोले: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोले: अकोले तालुक्यातील घाटघर येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी जानेवारी ते ऑगस्ट २०१८ या काळात दम देत वेळोवेळी अत्याचार केला. पिडीत मुलीने राजूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी कि, पिडीत मुलगी घरात एकटी असल्याचा व अल्पवयाचा गैरफायदा घेत गोविंद सोडनर, अंकुश सोडनर, भगवान जगनर , हरी सोडनर, किसन उकले (सर्व रा. घाटघर) यांनी जानेवारी ते ऑगस्ट २०१८ कालावधीत फिर्यादी मुलीस वेळोवेळी दमबाजी  करत अत्याचार केला.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

तसेच झालेला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर तिने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. गोविंद सोडनर, अंकुश सोडनर, भगवान जगनर , हरी सोडनर, किसन उकलेयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजूर पोलीस करत आहे.

websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here