Home संगमनेर संगमनेर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

संगमनेर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 

पालकांनी रंगकामासाठी केली 17000/-रुपये लोकवर्गणी जमा

संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी(मालूंजे)येथे भारताचा 72 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन खरात होते.
उपस्थित वयोवृद्ध व्यक्तींच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक केशव घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची प्रगती, शाळेला विविध सामाजिक संस्था तसेच शिक्षणप्रेमी नागरिक यांनी आतापर्यंत केलेली मदत विशद केली. 
शाळेचे रंगरूप जर पालटायचे असेल तर सर्वप्रथम रंगकाम करून शालेय भिंतींवर चित्रकाम करणे गरजेचे आहे,असे मत मुख्याध्यापक केशव घुगे यांनी मांडले. नुसते मत मांडून न थांबता शालेय रंगकाम व चित्रीकरणासाठी मुख्याध्यापक केशव घुगे यांनी 2100/- रुपये घोषित केले,शाळेच्या उपाध्यापिका सुरेखा आंधळे  मॅडम यांनी 2100/- रुपये, तसेच संदिप आंधळे(नाशिक) यांनीही आपल्या मुलीचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून त्यातून बचत झालेल्या पैशांतून शाळेला 2000/- रुपये.
 सप्तशृंगी मुद्रणालयचे काशिनाथ आडेप मामा यांनी 1100/- रुपये, 
सागर सुभाष खरात 1500/- रुपये,साहेबराव तुकाराम खरात 1111/- रुपये, रावसाहेब शांताराम खरात 1100/-रुपये,दिलीप नारायण खरात 1100/-रुपये, मनोज खरात 500/- रुपये, संदिप नारायण खरात 500/- रुपये,सोनाली गोसावी 500/-रुपये,प्रभाकर खरात 500/-रुपये,गंगाधर खरात 500/-रुपये,व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनीषा दीपक खरात 500/-रुपये, आनंदा सखाराम खरात 500/-रुपये,श्रद्धा रविंद्र वाघमारे 500/-रुपये, जनार्दन तुकाराम खरात500/-रुपये,भागवत रामनाथ नागरे 200/-रुपये,दिलीप रभाजी खरात 200/-रुपये,विलास नागरे 101/-रुपये,संदिप रकटे 101/- रुपये,मथु खरात 101/-रुपये, एकनाथ पुरी 101/-रुपये
 असे एकूण 17,420/-रुपये (सतरा हजार चारशे वीस रुपये) एवढी लोकवर्गणी* जमा करण्याचे नियोजन झाले.
पंधरा दिवसात सदर कामाला सुरुवात करण्याचे ठरवण्यात आले. 
तसेच नेताजी पतसंस्था मालूंजे यांनी झाडांच्या सुरक्षिततेसाठी 5 संरक्षक जाळ्या 8 दिवसात देण्याचे घोषित केले.
विद्यार्थ्यांनी खूप बहारदार भाषणे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा आंधळे मॅडम यांनी केले.
सर्व पालक व शिक्षणप्रेमी नागरिक  सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
ग्रामपंचायत व पालकांनी विद्यार्थ्यांना भरपूर खाऊ दिला.
एकंदरीत संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports,Entertainment NewsSangamner Taluka NewsAkole Taluka NewsC News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here