Home राष्ट्रीय या तीन राज्यांत कॉंग्रेस सत्तेवर येणार भाजपला मोठा धक्का

या तीन राज्यांत कॉंग्रेस सत्तेवर येणार भाजपला मोठा धक्का

या तीन राज्यांत कॉंग्रेस सत्तेवर येणार

नवी दिल्ली: भाजपशासित मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये आगामी विधानसभा निवडणुकात भाजपला मोठा धक्का बसण्याची श्यक्यता असून या तीनही राज्यांमध्ये कॉंग्रेस सत्ता स्थापन करेल असे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या तिन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल या सर्वेक्षणातील अंदाजानुसार लागल्यास भाजपसाठी हा मोठा धक्काच असेल असे जाणकारांचे मत आहे.  दरम्यान लोकसभा  निवडणुकीचा विचार करता या तिन्ही राज्यांमधील लोकांनी नरेंद्र मोदी यानांच पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती दिली आहे.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

एबीपी न्यूज आणि सी व्होटरणे हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांपैकी कोंग्रेसला 117, भाजपला 106 आणि इतरांना 7 जागा मिळतील मात्र मध्यप्रदेशात पंतप्रधान पदासाथी 54 टक्के लोकांनीच मोदींनांनाच कौल दिला आहे. राहुल गांधींना 25 लोकांनी पसंती दर्शवली . मध्यप्रदेश च्या मुख्यमंत्री पदासाठी शिवराज चव्हाण यांना 42 टक्के , जोतिरादित्य सिंधिया यांना 30टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. छातीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागा असून त्यापैकि कोंग्रेसला 54 टक्के भाजपला 33 टक्के इतरांना 3 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तथापि छातीसगड च्या मुख्यमंरी पदासाठी आजही 34 टक्के लोकांचा कौल रमन सिंह यानाचा आहे. तर कोंग्रेसमधून बाहेर पडलेल्या अजित जोशी यांना 17 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी कोंग्रेसला 130 जागा तर भाजपला 50 व इतर 13 जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान पदासाठी तीनही राज्यांमध्ये नरेंद्र मोदी राहुल गांधींच्या पुढे आहेत.

websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports,Entertainment NewsSangamner Taluka NewsAkole Taluka NewsC News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here