Home अकोले अकोले तालुक्यात आज १० करोनाबाधित आढळले, सर्वाधिक राजूर

अकोले तालुक्यात आज १० करोनाबाधित आढळले, सर्वाधिक राजूर

Akole coronavirus today 10 infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज पुन्हा १० करोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये नवलेवाडी, वाशेरे, हिवरगाव आंबरे,धामणगाव आवारी, शिवाजीनगर कारखाना रोड, राजूर येथे सर्वाधिक आज तीन रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २५६ इतकी झाली आहे. सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण ५२ इतके आहेत. आत्तापर्यंत करोनाने सात जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात हिवरगाव आंबरे येथील ५२ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथील ५९ वर्षीय पुरुष तर ५१ वर्षीय महिला, वाशेरे येथे ८५ वर्षीय महिला, धामणगाव आवारी येथे ६० वर्षीय महिला, कारखाना रोड येथे ३५ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे २३ वर्षीय तरुणी यांचा समावेश आहे. राजूर येथील रुग्णसंखेत तीन ने वाढ झाली आहे. यात ४३ पुरुष, ३४ वर्षीय महिला, ७५ वर्षीय वृद्ध यांना करोनाची लागण झाली आहे. 

Web Title: Akole coronavirus today 10 infected

Get See:  Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here