Home महाराष्ट्र पार्थ अजून लहान आहे, त्याला आपण समजून घेतले पाहिजे: अजित पवार

पार्थ अजून लहान आहे, त्याला आपण समजून घेतले पाहिजे: अजित पवार

Parth is still young, we should understand Ajit pawar

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेले पवार कुटुंबीयात पार्थ मुळे चांगलेच महाभारत सुरु आहे. पार्थ पवारांच्या जय श्रीराम या नाऱ्यामुळे आजोबा शरद पवार नाराज असल्याचे दिसत असताना त्यांनी त्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. त्यामुळे वडील अजित पवार यांनी पार्थ अजून लहान आहे त्याला समजून घ्या असे म्हणत. तसेच त्याची समजूत घातली पाहिजे तो हळूहळू तयार होईल, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली आहे.

सध्याच्या काळात पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले आहे. मुख्यतः पार्थने राममंदिरासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे ते नाराज आहेत. पार्थ अपरिपक्व आहे. त्याच्या बोलण्याला काडीचीही किंमत देत नाही अशी नाराजी मेडियासमोर व्यक्त केली होती.

पार्थच्या वेगळ्या भूमिकेवरून शरद पवार यांनी निरोप देऊन अजित पवारांना घरी बोलावून घेतले होते. पार्थने राम मंदिराच्या संदर्भात केलेली विधाने पक्षाच्या भूमिकेशी विसंगत आहे. हे प्रकार वेळीच थांबले पाहिजेत. नाहीतर ज्या भूमिकेवर पक्ष उभा केला त्याला तडा जाईल अशा शब्दात शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.   

Web Title: Parth is still young, we should understand Ajit pawar

Get See:  Latest Marathi News

संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here