Sangamner: संगमनेर तालुक्यात १९ करोना रुग्णांची वाढ
Sangamner | संगमनेर : संगमनेर तालुक्यात गुरुवारी आणखी १९ रुग्णांची वाढ झाली आहे. खासगी प्रयोगशाळेतून ७ तर अॅटीजेन टेस्ट मधून १२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यामुळे तालुक्यात करोनाबाधितांची संख्या १११४ इतकी झाली आहे. आत्तापर्यत ८८३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शहरातील इंदिरानगर येथे ५९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ३१ वर्षीय पुरुष, जनता नगर येथे ७२ वर्षीय वृध्द, पावबाकी रोड येथे ४५ वर्षीय महिला, गणेश नगर येथे ४२ वर्षीय महिला, तालुक्यात निमोण येथे ३९ वर्षीय व्यक्ती, राजापूर येथे ३२ वर्षीय महिला असे सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अॅटीजेन टेस्ट मधून १२ अहवाल पॉझिटिव्ह यामध्ये शहरातील भारतनगर येथे ५९ वर्षीय पुरुष, सय्यदबाबा चौक येथे ६२ वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथे १६ वर्षीय तरुणी, ३५ व ६६ वर्षीय महिला, घोडेकर मळा ४८ वर्षीय महिला, २८ वर्षीय तरुण, तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे ३० वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथे २५ वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथे ४५ वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे ४० वर्षीय महिला व दीड वर्षीय बालिकेला करोनाची बाधा झाली आहे.
Web Title: Sangamner Taluka 19 coronavirus patient increased
Get See: Latest Marathi News
संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.