Coronavirus | अकोले: ॲन्टीजन टेस्टमध्ये ०९ व खाजगी प्रयोगशाळेतील एक असे १० व्यक्ती कोरोना बाधित आल्यानंतर सायंकाळी पुन्हा खासगी प्रयोगशाळेतील अहवालात तीन पॅाझिटीव्ह आले आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण संख्या २५९ झाली आहे.
सकाळी शिवाजीनगर, कारखाना रोड, नवलेवाडी सह तालुक्यातील धामणगाव आवारी, वाशेरे, हिवरगाव आंबरे, व राजुर येथील व्यक्ती कोरोना बाधित आल्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात कोतुळ येथील तीन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
खानापुर येथील कोविड सेंटरमध्ये ७७ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये शहरातील, शहरातील कारखाना रोड येथील ३५ वर्षीय महीला, शिवाजीनगर २३ वर्षीय महीला, नवलेवाडी येथील ५९ वर्षीय पुरुष ५१ वर्षीय महिला, धामणगाव आवारी ६० वर्षीय महीला, वाशेरे ८५ वर्षीय महिला , हिवरगाव आंबरे येथील ५२ वर्षीय पुरुष, राजुर येथील ४३ पुरुष, ३४ वर्षीय महिला तर खाजगी प्रयोगशाळेतील अवाहलात राजुर येथील ७५ वर्षीय पुरुष अशी १० अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आले त्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात कोतुळ येथील ५६ वर्षीय महीला, ३८ वर्षीय महिला, व ६२ वर्षीय महीला अशा दिवसभरात एकुण १३ व्यक्ती पॅाझिटीव्ह आले आहेत.
तालुक्यातील कोरोना बाधितांची एकुण संख्या २५९ झाली आहे त्यापैकी १८८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले ६४ व्यक्तीवर उपचार सुरु आहे. यात ३६ रुग्णांवर खानापुर कोविड सेंटर तर २८ रुग्णांवर खाजगी व ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहे.तर ७ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Web Title: Coronavirus Akole Taluka 13 infected today
Get See: Latest Marathi News