Home अकोले अकोले: रोखपाल लक्ष्मण डगळे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

अकोले: रोखपाल लक्ष्मण डगळे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

रोखपाल लक्ष्मण डगळे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी -अकोले तालुक्यातील खिरविरे येथील अहमदनगर डीस्ट्रीक सेंट्रल को ऑपरेटिव बँकेचे रोखपाल लक्ष्मण गंगाराम डगळे यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा समीती समस्थ ग्रामस्थ खिरविरे यांचे वतीने सेवापुर्ती गौरव सोहळा मोठया आनंदमय वातावरण संपन्न करण्यात आला.
या प्रसंगी  कार्यक्रमाचे अध्यक्ष एकदरे सोसायटीचे चेअरमन गोगा चौरे हे होते.
सत्कारमुर्ती लक्ष्मण डगळे यांनी शिपाई पदापासून कामाला सुरूवात केली. नंतर त्यांना रोखपाल हे पद मिळाले. त्यांनी छत्तीस वर्ष सेवा केली.
या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मण डगळे यांनी सत्काराला उत्तर देताना प्रत्येक नाते मनात जपले पाहीजे. नात्यापेक्षाही विश्वासाला जास्त किंमत असते. त्यामुळे ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मारू नका. असे मत प्रतिपादन केले.
यावेळी मृतसागर दुध संघाचे संचालक सुभाष बेणके यांनी आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण नाती अशी मिळवा कि कोणाला त्याची किंमत करता येणार नाही असे प्रतिपादन केले.
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश शहा यांनी आयुष्य खुप लहान आहे. धन दौलत कोणी कोणाला देत नसते. त्यासाठी माणुसकी जपत रहा. सुख दुःखाचा कोणताही प्रसंग असो त्यासाठी साथ देत रहा असे प्रतिपादन केले.
खिरविरे सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रकाश पराड यांनी स्वतःच्या गरीबीची लाज कधीच वाटू देवू नका. पैसा कमी असला तरी आपल्या आई वडीलांची मेहनत कधीच कमी नव्हती हे विसरू नका असे प्रतिपादन केले.
बँकेचे शाखा अधिकारी विष्णु तळपाडे यांनी जीवनात पैशांची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात. पण माणसाची साथ व्याजाने मिळायची सुविधा असून सुरू झाली नाही. त्यासाठी नाती जपण्याचे मत व्यक्त केले.
डॉ. अशोक डगळे यांनी सर्वगुणसंपन्न कोणीही जन्माला येत नाही. लोकांमधले चांगले गुण शोधा वाईट दुर्लक्षित करा. नाते तेच असते जे आपलेपणाची जाणीव करून देतात असे प्रतिपादन केले.
सोसायटीचे सचिव शिवाजी सहाणे यांनी नाते हे सुख, दु: खात सोबत राहते. त्यासाठी जीवनात विश्वास आत्मसात करा. त्यामुळे अशक्य गोष्टी शक्य होतात असे मत प्रकट केले.
त्याचप्रमाणे समाजसेवक हरीभाऊ बेणके, एकदरे दुध संस्थेचे श्री. भांगरे यांनीही सत्कारमुर्ती लक्ष्मण डगळे यांचे प्रति विचार व्यक्त करून गौरोद्गार व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच गिताबाई रावते, उपसरपंच सुनंदा आवारी, सदस्य पंढरीनाथ शांताराम बेणके, कांताबाई बेणके, माजी सहाय्यक उपायुक्त मारूती डगळे, शत्रुघ्न डगळे, सर्वोदय विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत तसेच सर्व शिक्षक कर्मचारी, हारी बेणके, बंडु पराड,त्रिंबक आवारी, भास्कर सदगिर, जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, खिरविरे तसेच एकदरे विकास सोसायटीचे व दुध संघाचे चेअरमन,व्हा. चेअरमन,सभासद, निळ्कंठेश्वर बचतगट, बहुजन विकास मंडळ, समस्त ग्रामस्थ खिरविरे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामदास आवारी यांनी केले. तर ग्राम पंचायत सदस्य पंढरीनाथ बेणके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवापुर्ती गौरव सोहळा समस्थ ग्रामस्थ खिरविरे यांनी परिश्रम घेतले.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here