Home अकोले अकोले : राजुर व परिसरात अवैध धंदयावर पोलिसांचे छापे- १४ जणांना अटक

अकोले : राजुर व परिसरात अवैध धंदयावर पोलिसांचे छापे- १४ जणांना अटक

राजुर व परिसरात अवैध धंदयावर पोलिसांचे छापे

राजुर : –  अकोले तालुक्यातील राजुरसह मान्हेर व वारंघुशी येथे पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध दारु दुकांनावर तसेच जुगार अडडयांवर छापे टाकुन १४ जणांना अटक केली असुन त्यातील १० जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, राजुर येथे अदालतनाथ रामचंद्र शुक्ला या अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई १९ हजार ६०४ रुपयांच्या देशी दारुच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.  हॉटेल साईराज येथे कारवाई केली असता देशी व विदेशीसह ४ लाख ५०हजार ८१७ रुपयांचा माल मिळुन आला असुन आदित्य चिंतामण गायकर या वेटरला अटक करण्यात आले आहे. तसेच मान्हेरे येथे तीन छापे टाकले असुन विठ्ठल हिरामण पोटकुले यास १८३२ रुपयांच्या मुद्देमालसह, तर गोरक्षनाथ अशोक अवसरेकर यांस ९८८ रुपयांचा मुद्देमालासह चंद्रकांत हिरामण गभाले यांस ८८४ रुपयांच्या मुद्देमालसह ताब्यात घेतले आहे. मान्हेरे येथील जुगार अडडयावर छापा टाकत  १४जणांना ताब्यात घेतले व नंतर त्यातील १० जणांची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक रंजन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय . कादरी, उपनिरीक्षक नितीन बेंद्रे, नितीन सोनवणे, रावसाहेब कदम, रवींद्र वाकचौरे , थोरात आदींसह राजुर पोलीस ठाण्यातील सर्वांनी सहभाग घेतला.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here