Home महाराष्ट्र ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक ; तिघांचा मृत्यु

ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक ; तिघांचा मृत्यु

ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक ; तिघांचा मृत्यु

वर्धा : – भरधाव  ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणाचा मृत्यु झाला. हा अपघात सुमारे १० वाजण्याच्या सुमारास  यवतमाळ मार्गावरील पुनर्वसन भागात  झाला.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

अनिकेत घोडसे(वय १९ रा. एकता कॉलनी) अजय कुमरे व प्रितेश कौरती तिघेही रा. सलोड अशी मृतकांची नावे आहेत. तिघेही वर्धा येथुन एमएच – ३२/एजी -८६९४ क्रमांकाच्या दुचाकीने शनिवारी रात्री १० वाजता गावी जात होते. त्यांची दुचाकी यवतमाळ मार्गावरील पुनर्वसन भागातील मोठया गतिरोधकजवळ आली असता विरुद्ध दिेशेने भरधाव आलेल्या एमएच-२९/एके-९०९ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरुन तिन्ही व्यक्ती  गंभीर जखमी झाले . त्यांना उपचारासाठी सावंग रुग्णालयात नेले असता उपस्थित वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.  अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार दत्तात्रय गुरव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठुन रस्त्यावरिल अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत मार्ग वाहतुकीस मोकळा केला. या घटनेमुळे सलोड  गावावर शोककळा पसरली. ट्रॅव्हल्सचालक विरुध्द अपघाताचा गुन्हा सावंगी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.  


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here