Home महाराष्ट्र मित्राच्या त्रासाला कंटाळुन तरुणीची आत्महत्या

मित्राच्या त्रासाला कंटाळुन तरुणीची आत्महत्या

मित्राच्या त्रासाला कंटाळुन तरुणीची आत्महत्या

पुणे : – नातेवाइवाकांना मारुन टाकण्याच्या धमक्या देत  सतत त्रास देणार्‍या मित्रास कंटाळून तरुणीने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे. हिंगणे खुर्द येथे दि. १७ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

प्रतीक्षा प्रकाश कोळेश्वर (वय १९, रा. एकता कॉलनी, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.  याप्रकरणी प्रकाश कोळेश्वर( वय ५४,रा .) नांदेड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुल रा. आकोली बायपास, हिंगोली याच्याविरोद्धात सिंहगड रोड पुलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मयुल आणि प्रतीक्षा यांची हिंगोली शहरात भेट झाली. काही महिन्यांपुर्वी प्रतीक्षा शिक्षणासाठी पुणे येथे आली आणि कोथरुड परिसरातील एका हॉस्टेलमध्ये राहत होती. हॉस्टेलमध्ये राहत होती. आरोपी मयुल हा प्रतीक्षावर प्रेम करीत होता. मात्र दोघांचे भांडण झाल्यामुळे ती तिच्याशी बोलत नव्हती. आरोपीने प्रतीक्षाबरोबर काढलेले फोटो तिच्या कुटुंबाला दाखविले आणि नातेवाइकांना जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी कॉल करित आणि वॉटसपवर मॅसेज पाठवुन संवाद साधण्याच्या प्रयत्न करीत होता. आरोपी मयुल हा पुणे शहरात आला. त्याने प्रतीक्षाची भेट घेत तिच्यासोबत भांडण केले. आरोपी मयुलच्या शारिरिक व मानसिक त्रासाला ती कंटाळली होती. दि. १७ ऑगस्ट रोजी प्रतीक्षा तिच्या हिंगणे खुर्द येथे राहणाऱ्या मैत्रिणाच्या घरी  गेली होती.  काही कारणास्तव मैत्रिण घराबाहेर पडली, व प्रतीक्षाने नैराश्यातुन कंटाळुन गळफास घेत आत्महत्या केल्याचे तक्रारित नमुद केले आहे.

प्रतीक्षाला आत्महत्या करण्यास प्र‍वृत्त केल्याप्रकरणी आरोपी मयुलविरोद्धात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सिंहगड पोलिस करित आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


websites


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here