Home अकोले अकोले: राहीबाई पोपेरे यांच्या नव्या घराला लागली गळती

अकोले: राहीबाई पोपेरे यांच्या नव्या घराला लागली गळती

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी –पारंपारीक गावरान वाणांचे जतन करून बीज बँक निर्माण करणाऱ्या व राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अकोले तालुक्यातील कोभाळणे येथील बीजमाता राहीबाई पोपेरे यांना साकारने बांधुन दिलेल्या घरात पाणी पाझरत आहे. त्यामुळे या घराच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोंभाळणे(ता.अकोले) येथे विविध कडधान्ये, भाजीपाला व दुर्मिळ औषधी वनस्पतींचे अस्सल गावरान बियाणे जतन करण्याचे काम राहीबाई अनेक वर्षापासून करतात. त्यांच्या या कामाची दखल घेत मागील वर्षी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात राहीबाई यांना त्यांचा दुर्मिळ बियाणांच्या बँकेसाठी स्वतंत्र खोली व प्रदर्शन दालन बांधुन देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे अतिशय वेगाने सुत्र हलवित अतिशय देखणी इमारत बांधुन राहीबाईंकडे सोपविण्यात आली. यावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते या वास्तुचे उद्घाटनही करण्यात आले. या वर्षी पावसाला सुरुवात झाली व पहिल्याच पावसाने राहीबाई यांच्या नव्या घराच्या बांधकामाची लक्तरे उघडी पडली.
पायाच्या बाजुने दगडी तर वर विटांचे बांधकाम असलेल्या दोन्ही बांधकामाच्या मधोमध काही तृटी असल्याचे दिसते. त्यामुळे पावसाचे पाणी खोल्यांमध्ये पाझरायला सुरुवात झाली. जिवापाड जपलेल्या काही बियाणाच्या वाणांना धोका पोचवण्याच्या शक्यतेने त्यांनी धावपळ करत सर्व बीयाणे इतरत्र हलविले.त्यांचे जुने घर आजही सुस्थितीत असल्याने राहीबाई अभिमानाने सांगत आहेत.
Website Title: Akole new house of Rahibai Popere started to leak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here