अकोले: पवार कुटुंबीयांकडून कातळापुर विदयालयात शालेय साहित्याचे वाटप.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी: – नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विद्या मंदिर कातळापूर ( ता.अकोले ) येथील विद्यालयात पवार कुटुंबीयांकडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या नऊ वर्षा पासुन विजय शिवराम पवार हे विद्यालयातील दहा गरीब,गरजुवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेतात.यावर्षीही दहा दत्तक विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके,वह्या,कंपास,रंगपेटी, परीक्षा फी ,सहल खर्च त्यांनी दिला .तसेच त्यांचे बंधू महेंद्र पवार यांनीही पंन्नास विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला.तसेच बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी पेन आणि सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विजय पवार यांनी कठिण परिस्थिती कधिच खचून जावू नका तिच्यावर मात करून पुढे जायला शिका.सद्याच्या काळात बुद्धीवंताना मोठ मोठ्या संधी चालून येतात.म्हणून तुम्ही मन लावून आणि प्रामाणिकपणे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत राहा.यश निश्चीत मिळेल. असे मत व्यक्त केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने वर्तमान पत्राचे नियमित वाचन करावे त्यासाठी चार वर्तमानपत्राचा खर्च पूर्णपणे उचलण्याचे कबूल केले. महेंद्र पवार यांनी गरिबीचे चटके आम्ही अतिशय जवळून सोसले आहेत म्हणून आपल्या सारखे दुःख सहन करणाऱ्यांच्या दुःखाची दाहकता कमी करण्यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन भाई पवार होते.त्यांनी कविता सादर करून विद्यार्थ्यांची चांगली दाद मिळवली या प्रसंगी आशा पवार ,शाळा समिती अध्यक्ष रामजी काठे ,वसतिग्रूह अधिक्षक धिंदळे सर ,हरी पंडीत, मुख्याध्यापक के.एल.नवले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन सर्व संचालक मंडळ आदिंनी कौतुक केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर मोखरे, गोरख मालुंजकर, संजय व्यवहारे, अनिल पवार, श्री.बैरागी,श्रीमती जंबे व धनंजय मोहंडुळे आदिंनी परीश्रम घेतले.
Website Title: Akole School Literature Allocation in the Katalapur School