अकोले: तरुणीस दारू पाजून तरुणीवर अत्याचार
अकोले: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करून त्याचबरोबर दुसऱ्या पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी मारहाण करण्यात आल्याची घटना भंडारदरा परिसरात घडली आहे.
याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी कि, प्रदीप भिकाजी जगताप याने अत्याचारित पिडीत तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून शेंडी येथून खडवली येथे नेले. व तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केले. तसेच अशा कदम व भाऊसाहेब जगताप यांनी तरुणीस दारू पाजून मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिली. प्रदीप भिकाजी जगताप, आशा विनायक कदम, भाऊसाहेब भिकाजी जगताप सर्व रा. शेंडी भंडारदरा या सर्व आरोपींनी पिडीत तरुणीस आपल्या राहत्या घरी डांबून ठेवले.
तसेच प्रदीप याने दारू पाजून पिडीतेबरोबर शरीरसंबंध करून फोटो व व्हिडियो प्रसारित करण्याची धमकी दिली व दुसऱ्या पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी मारहाण व शिवीगाळ केली. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास राजूर पपोलीस करीत आहे.
Website Title: Crime News Akole Woman raped