Home अकोले अकोले तालुक्यातील पाच महसूल मंडलातील ११६ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत

अकोले तालुक्यातील पाच महसूल मंडलातील ११६ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत

अकोले तालुक्यातील पाच महसूल मंडलातील ११६ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत

अकोले तालुक्यातील पाच महसूल मंडलातील ११६ गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आला असून अकोले तालुका भाजप ने महसूलमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील व पालकमंत्री ना. राम शिंदे सर यांचेकडे केलेले पाठवपुराव्याला यश आले आहे.
           भारतीय जनता पार्टीने अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती तालुक्यातील अकोले विरगाव ब्राम्हणवाडा समशेरपूर कोतुळ या महसूल मंडलात पर्जन्यमान कमी झाले असून येथील पीक पाहणी पन्नास पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेली गावांचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करण्याची वेळोवेळी मागणी केली होती तसेच राहुरी येथे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील व संगमनेर, राहुरी, नगर येथे पालकमंत्री ना राम शिंदे सर यांचे कडे वेळोवेळी शिष्टमंडळाने भेट घेऊन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी केली होती
         पालकमंत्री ना राम शिंदे सर यांनी महसूलमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून चार महसूल मंडळ मध्ये एकशे सोळा गाव दुष्काळ गाव घोषित करण्यात आला भाजपने गावांची आणेवारी कमी करून ती गावे दुष्काळी घोषित करण्याची मागणी केली होती या पाच महसूल मंडळातील गावे दुष्काळ असल्याचे निदर्शनास प्रशासन च्या निदर्शनास आणून दिले होते यांचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
        अकोले तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे,  जिप सदस्य डॉ किरण लहामटे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी विशेष प्रयत्न केले.
      कोट:-
अकोले तालुक्यातील राहिलेले तीन महसूल मंडल मध्येही दुष्काळी परिस्थिती आहे भाताचे पीक वाया गेली आहे त्यामुळ ही राजूर, शेंडी व साकीरवाडी ही मंडल ही दुष्काळी घोषित करण्यासाठी पाठपुरावा करू
     — श्री.जालिंदर वाकचौरे
गटनेते, भाजप जिप गटनेते
     –श्री सिताराम भांगरे
तालुका अध्यक्ष, भाजप अकोले

Website Title: akole news Akole taluka in the list of drought-hit villages


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here