Home अकोले अकोले: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी अशोक उगले

अकोले: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी अशोक उगले

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी अशोक उगले

कार्याध्यक्षपदी आवारी, सचिवपदी सातपुते; पत्रकार हल्ला विरोधी समिती जिल्हा सचिवपदी संतोष साळवे 

अहमदनगर । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अकोले तालुकाध्यक्षपदी पत्रकार अशोक उगले तर कार्याध्यक्षपदी हेमंत आवारी, सचिवपदी प्रा. विद्याचंद्र सातपुते, सहसचिव अण्णासाहेब चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या वार्षिक सर्व साधारण सभा कार्याध्यक्ष हेमंत आवारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी निरिक्षक राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, जेष्ठ पत्रकार रामलाल हासे आदी उपस्थित होते. प्रथम गत वर्षात पत्रकार डी. एम. जगताप, सूर्यभान सहाणे, मातोश्री लक्ष्मीबाई मुंडे, पौर्णिमा भोकरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 
वर्षभरात संघाने राबविलेल्या उपक्रमांबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला व पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली. 
यावेळी यावर्षी पत्रकार दिनानिमत्त बाळशास्त्री जांभेकर दिनानिमित्ताने जेष्ठ पत्रकार स्व. सूर्यभान सहाणे यांच्या नावाने पुरस्कार देण्याविषयी चर्चा करुन यावर्षीचा पुरस्कार जेष्ठ पत्रकार अ‍ॅड. बाळ बोठे पाटील यांना जाहीर करण्यात आला.
अध्यक्षपदासाठी सर्वानुमते अशोक उगले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर उपाध्यक्षपदी प्रवरा विभागातील जेष्ठ पत्रकार हरिभाऊ आवारी, राजूर विभागातून नितीन शहा, राम चोथवे,  मुळा विभागातील संजय फुलसुंदर, यांची तर खजिनदारपदी जगन्नाथ आहेर, संपर्क प्रमुखपदी राम भांगरे, कार्यालयीन प्रमुखपदी हरिष कुसळकर, प्रकल्प प्रमुख दादाभाऊ फापाळे, प्रसिध्दी प्रमुख निखिल भांगरे, वृत्तवाहिनी अध्यक्षपदी सचिन खरात, सांस्कृतीक व नियोजन विभाग प्रमुख निलेश वाकचौरे, सोशल मिडीया प्रमुख शुभम फापाळे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी अशोक उगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन विद्याचंद्र सातपुते यांनी केले तर आभार संजय शिंदे मानले.
यावेळी त्यांच्या निवडीचे राज्याध्यक्ष राजा माने, संघटक संजय भोकरे, कार्याध्यक्ष वसंत मुंडे, राज्य प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, नानासाहेब जवरे, उपाध्यक्ष अनिल रहाणे, खजिनदार चंद्रकांत झुरंगे, सचिव नवनाथ कुथाळ, संपर्कप्रमुख पंढरीनाथ पगार आदींनी अभिनंदन केले.

Website Title: head of Maharashtra state Marathi journalist Sangh Taluka, Ashok Ugale


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here