गु.रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
गु.रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यानिकेतन संस्था संचालित गु.रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास डॉ. विश्वासराव येवले,पुणे व सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अँड.मनोहरराव नानासाहेब देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. क्रीडा स्पर्धेत जिल्हा,विभाग पातळीवर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे कोषाध्यक्ष तथा पुणे येथील चॅम्पियन स्पोर्ट्सचे मालक विवेकजी मदन यांनी मुलांना मोफत ट्रक सूट यावेळी भेट म्हणून दिले.
यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमतेच्या जोरावर जिद्द आणि चिकाटीला मेहनतीची साथ देत,आपल्यातील न्यूनगंड काढून टाकल्यास ते आयुष्यात यशस्वी ठरतील असा आशावाद सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अँड.मनोहरराव नानासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी लेखक डॉ. विश्वास येवले ,संस्थेचे कोषाध्यक्ष विवेक मदन, सचिव टी.एन.कानवडे, माजी प्राचार्य एम.के.बारेकर, सहसचिव मिलिंद उमराणी, संस्थेचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना अँड.देशमुख म्हणाले की जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे,हे जपल्यास यश पायाशी लोटांगण घालील त्यामुळे आयुष्यात कितीही मोठे झाला तरी मागे वळून पाहण्यास विसरू नका असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ.येवले म्हणाले की अभ्यास आणि खेळ यांचा योग साधल्यास जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.यासाठी शालेय शिक्षण घेत असताना खेळालाही महत्त्व द्या असे सांगत त्यांनी आपल्या कविता सादर केल्या.
विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे यांनी अहवाल वाचन केले तर अध्यापक बी.व्ही. भोसले,एस.आर.गिरी, संतराम बारवकर, डी.बी. पगारे, व्ही.टी.तारू, श्रीकांत घाणे, आर.पी.आढळ आदींनी आपल्या विभागात नाविन्य मिळवलेल्या स्पर्धकांचे वाचन केले. शरद तुपविहिरे यांनी सूत्रसंचालन केले.उपप्राचार्य पर्बत एल.पी. यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. हा कार्यक्रम पार पाडण्यास सर्व शिक्षक व शिक्षेकेतर यांची मोलाची साथ लाभली.
राजूर प्रतिनिधी – ललित मुतडक
Website Title: sarvodaya vidya mandir Vidyalay Rajur annual prize distribution ceremony
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: