Home अकोले Akole: अकोले तालुकात आज १६ व्यक्ती करोनाबाधित

Akole: अकोले तालुकात आज १६ व्यक्ती करोनाबाधित

Akole taluka Corona Decreases today 16 infected 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त शासकीय प्रयोगशाळेतून सहा , खासगी खासगी प्रयोगशाळेतून चार तर अॅटीजेन चाचणीत सहा असे एकूण १६ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १९८१ इतकी झाली आहे.

आज प्राप्त अहवालात धुमाळवाडी येथील ३५ वर्षीय पुरुष, अकोले येथील ५१ व ५० वर्षीय पुरुष, लिंगदेव येथील दोन ३५ वर्षीय पुरुष, २४,२९ वर्षीय तरुण, पिंपळगाव नाकविंदा ३३ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ५४ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथील ३५,३६,३५ वर्षीय पुरुष, बदगी येथील १७ वर्षीय मुलगा, कोतूळ देविगल्ली येथे ७ वर्षीय मुलगा, ३३ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला असे १६ जण आज बाधित आढळून आल्याने एकूण संख्या १९८१ वर पोहोचली आहे.

तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मास्क वापरणे व एकमेंकामधील सुरक्षित अंतर पाळल्यास आपण करोनाला हद्दपार करू शकतो.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka Corona Decreases today 16 infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here