Home अहमदनगर चोरट्यांची गाडी पलटी, ग्रामस्थांवर हवेत गोळीबार, चोरटे फरार

चोरट्यांची गाडी पलटी, ग्रामस्थांवर हवेत गोळीबार, चोरटे फरार

Shevgaon Thieves overturn vehicle shoot villagers in the air

शेवगाव | Shevgaon: शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द जवळ गुरुवारी चोरट्यांचा थरार घटना घडली आहे. चार चाकी वाहनातून शेळ्या चोरून नेल्या पळ काढणाऱ्या वाहनाला अपघात घडला व त्यात ग्रामस्थांनी पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी हवेत गोळीबार करत फरार झाले.

लाडजळगाव येथील पैठण पंढरपूर रस्त्यालगत मधुकर सदाशिव पाटील हे रहातात. या शेतकऱ्याच्या घराजवळ पत्राशेड मध्ये बांधलेल्या दोन शेळ्या चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री चोरल्या यावेळी शेळ्यांच्या आवाजाने जालिंदर पाटील यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा केला. शेळ्या गाडीत टाकून शेळ्यांसह गाडीतून घोगस पारगाव रस्त्याने पळाले. लाडजळगाव नागरिकांनी घोगस पारगाव येथील लोकांना फोनवरून माहिती देत सांगितले. पारगाव येथील नागरिकांनी बैलगाड्याने रस्ता अडविला. ते पाहून चोरटे पुन्हा माघारी फिरले. त्याच दरम्यान लाडजळगाव येथील ग्रामस्थ शेकते खुर्द याठिकाणी रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसले होते. चोरट्यांची गाडी येताच गाडीच्या दिशेने दगडफेक केली. चोरट्यांनी हवेत गोळीबार करत गाडी तलावाच्या कच्चा रस्त्याने घातली. मात्र अंधारामुळे त्यांना अंदाज न आल्याने गाडी उलटली. ग्रामस्थ येईपर्यंत चोरटे तेथून पसार झाले. गाडी मात्र तेथेच ठेवली गाडीमध्ये चार शेळ्या आढळून आल्या. त्यातील एक शेळी मृत झाली होती.  

शुक्रवारी मधुकर पाटील यांनी शेवगाव पोलिसांत फिर्याद दिली. या गाडीमध्ये एका महिलेचे आधार कार्ड प्रत आढळून आली. सदरील घटनेचा पंचानामा करण्यात आला.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Shevgaon Thieves overturn vehicle shoot villagers in the air

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here