अकोले तालुक्यात आणखी कोरोनाचे तीन रुग्ण तर एक मृत्यु
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी आणखी तीन रुग्नांची भर पडली आहे. यामध्ये कुंभेफळ येथील दोन तर शहरातील एका रुग्नाचा समावेश आहे. तर एका व्यक्तीचा करोनाने मृत्यु झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५१४ इतकी झाली आहे. तर ११ जणांचे बळी घेतले आहे.
खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार कुंभेफळ येथील २१ वर्षीय तरुण बाधित, सारडा पेट्रोल शेजारी ३७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात कुंभेफळ येथील ६० वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे.
तसेच शुक्रवारी धुमाळवाडी घोलपवस्ती येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तालुक्यातील हा अकरावा मृत्यू झाला आहे.
तसेच कोतुळ व ब्राम्हणवाडा येथील व्यक्तींचे स्वब घेण्यात आले असून त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.
Web Title: Akole Taluka Corona patient and Death update