Home क्रीडा IPL 2020: आयपीएलला करोनाचे ग्रहण, सीएसके चे १२ जण कोरोनाबाधित

IPL 2020: आयपीएलला करोनाचे ग्रहण, सीएसके चे १२ जण कोरोनाबाधित

दुबई | IPL 2020: कोरोनाचा प्रसार असल्यामुळे आयपीएल भारताबाहेर खेळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे टी २० सामना पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये भरली होती.

यूएई सर्व संघ दाखल झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, मात्र महेंद्रसिंग धोनी सीएसके यांच्या टीममधील एका गोलंदाजाला व ११ सदस्यांना करोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा आयपीएलला कोरोनाचे ग्रहण लागले दिसून येत आहे.

अद्याप याबाबत बीसीसीआय कडून अधिकृत माहिती मिळाली नसून कोणत्या खेळाडूला करोनाची लागण झाली आहे, हे मात्र कळालेले नाही. मिळविलेल्या माहितीनुसार भारतीय वेगवान गोलंदाजाला करोनाची लागण झाल्याचे समजते. शुक्रवार पासून संघाचे सराव सत्र सुरु होणार होते मात्र एक ११ सदस्य कोरोना बाधित आढळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सीएसके संघ हा पुन्हा एकदा विलगीकरणात आला आहे. या संघाची सर्वांची चाचणी करण्यात आली असून या सर्वांचा अहवाल प्राप्त होईल असे समजते. त्यामुळे कोरोनाने आयपीएलवर पुन्हा एकदा संकट निर्माण केले आहे.

Web Title: IPL 2020 coronation, 12 CSK coroners affected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here