सुरेश रैना परतला भारतात, रैना IPL २०२० खेळणार नाही
मुंबई: आयपीएल सुरु होण्याआगोदरच सिएसके संघाला आणखी एक धक्का बसला आहे. अगोदरच संघात करोनाचा शिरकाव झाला आहे. त्यात सुरेश रैना मायदेशी भारतामध्ये परतला आहे. तो यंदाचे आयपीएल खेळू शकणार नाही. याबाबत चैन्नई सुपर किंगने ट्विटरवर माहिती दिली आहे.
सुरेश रैना हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नाही. यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. चैन्नई सुपर किंग सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे असे चैन्नई सुपर किंगने ट्विटरवर माहिती दिली आहे.
आयपीएल चा तेरावा सिझन १९ सप्टेंबर रोजी सुरु होणार आहे. चैन्नई सुपर किंगसाठी मोठा धक्का समजला जातो. त्याचबरोबर या संघाचा एक गोलंदाजही करोनाबाधित असल्याने सरावाला मुकणार आहे. स्टाफला करोनाची बाधा झाल्याने त्यांचा विलगीकरण वेळ वाढविण्यात आला आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात होऊ शकणार नाही.
Web Title: Suresh Raina returns to India IPL 2020 will not play