महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास अटक
महाड | Mahad: शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास युनुस अब्दुल रज्जाक शेख यास शहर पोलिसांनी शनिवारी सकाळी त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
केवळ सात वर्षापूर्वी बांधलेली पाच मजली इमारत कोसळून १६ रहिवासीयांचे जीव गेले होते. तर ९ जण गंभीर जखमी झाले ही दुर्घटना २४ ऑगस्ट रोजी साडे सहा वाजेच्या दरम्यान कोसळली होती.
या प्रकरणी या इमारतीचा बिल्डर फारूक महामुदमिया काझी रा.तळोजा याच्यासह आर.सी.सी. कंन्सलटंट बाहुबली धामणे, आर्कीटेक्ट गौरव शहा नवी मुंबई, नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी व बांधकाम पर्यवेक्षक या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बाहुबली धामणे यांस अटक केली होती. त्यानंतर युनुस शेख यांचाही या इमारतीच्या बांधकामात सहभाग असल्याची तक्रार रहिवाशी यांनी केल्याने युनुस खान यालाही आज सकाळी दहा वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. आज दुपारी युनुस खान याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी बिल्डर फारूक काझी यांसह आणखी चार आरोपी फरार असून शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Web Title: Builder arrested in Mahad building accident