Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, ५४६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण, ५४६ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar corona updates today 29 august 2020 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६३२ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३५४७ झाली आहे.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेच्या अहवालात २३५, अॅटीजेन चाचणीत १२३ तर खासगी प्रयोगशाळेत २७४ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.

 जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेच्या अहवालात २३५ रुग्ण यामध्ये मनपा ९५, संगमनेर ४९, पाथर्डी १०, नगर ग्रामीण २१, श्रीगोंदा १, पारनेर ११, राहुरी ७, शेवगाव २७, जामखेड १, मिलिटरी हॉस्पिटल १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत १२३ रुग्णांमध्ये संगमनेर ४,राहता १३, नगर ग्रामीण २५, श्रीरामपूर ७, कॅन्टोनमेंट ७, श्रीगोंदा ११, अकोले २, कोपरगाव २३, जामखेड ४, कर्जत २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत २७४ रुग्णांची नोंद यामध्ये मनपा १३५, संगमनेर ३०, राहता १७, पाथर्डी ५, नगर ग्रामीण ३२, श्रीरामपूर १६, नेवासा ९, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले ५, राहुरी ४, कोपरगाव ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ५४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये मनपा २१९, संगमनेर ९, राहता ३०, पाथर्डी २५, नगर ग्रामीण ४४, श्रीरामपूर २०, कॅन्टोनमेंट १२, नेवासा २२, श्रीगोंदा १५, पारनेर २५, अकोले ८, राहुरी ४०, शेवगाव १३, कोपरगाव ३०, जामखेड २१, कर्जत ८, मिलिटरी हॉस्पिटल ३ आणि इतर जिल्हा २ अशा २ रुग्णांचा समावेश आहे.

सध्या एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६७५७ इतकी झाली आहे. सध्या उपचार सुरु असलेले रुग्नांची संख्या ३५४७ इतकी आहे. मयत २८१ तर एकूण रुग्ण बाधित संख्या २०८८५ इतकी झाली आहे.

Website Title: Ahmednagar corona updates today 29 august 2020 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here