अकोले तालुक्यात एका महिन्यात ऑक्सिजन प्लांट उभारणार: आमदार डॉ किरण लहामटे
अकोले | Akole: आदिवासी उपाययोजनेअंतर्गत ऑक्सिजन प्लांटसाठी १ कोटी २० लाख रुपये मंजूर झाले असून एका महिन्यात प्लांट उभा केला जाईल अशी माहिती आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamate) यांनी दिली आहे.
कोरोना काळ चालू असल्याने तालुक्यातील स्थिती आटोक्यात आणण्यासाठी राजकीय हेवेदावे बाजूला सारून आज अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची आढावा बैठक घेतली त्यातून सर्वांच्या अडीअडचणी तसेच कोण कोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी आढावा घेतला.
सर्व पक्षीय नेत्यांनी काही सूचना व त्यावर काय उपाय योजना करता येतील यावर चर्चा केली. आपण सर्व एकत्र येऊन या महामारीत उपाय योजना करू काही अडचण असतील त्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.
लवकरच सर्वांच्या सहकार्याने ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ.किरण लहामटे यांनी दिली.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. गंभीरे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, जेष्ठ नेते सुरेश खांडगे, सुरेश गडाख, डॉ .अजित नवले, अमित नाईकवाडी, अरुण रुपवते, प्रदीप हासे, विखे फाउंडेशनचे विकास वाकचौरे, अक्षय आभाळे, भाजपचे शहर प्रमुख सचिन शेटे,महेश नवले, नितीन गोडसे, सागर वाकचौरे, पत्रकार अमोल वैद्य, सागर शिंदे, आदी उपस्थित होते.
Web Title: Akole Taluka oxygen Plant Stand up Kiran Lahamate