Home अहमदनगर भारत बायोटेकची लस महाग का असा आमदार रोहित पवारांचा आक्षेप

भारत बायोटेकची लस महाग का असा आमदार रोहित पवारांचा आक्षेप

Rohit Pawar objection as to why Bharat Biotech vaccine is expensive

अहमदनगर: भारत बायोटेक च्या लसींच्या किमतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारच्या मदतीने आपल्याच देशात लस विकसित करण्यात आली असून लस महाग का? असा सवाल त्यांनी केला आहे.

सिरम ने परकीय संस्था सोबत संशोधन केले असून त्यांना रॉंयल्टी सारखे बंधने असू शकतात तरीही त्यांच्या लसींची किमत ३०० रुपये इतकी आहे. मात्र भारत बायोटेक ची स्वदेशी असम संशोधनासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला असतानाही त्यांची त्यांची लस महाग का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यासंभंधित कागदपत्रे खुली करावीत अशी मागणीही पवार यांनी केली आहे. सर्वसामान्य करातून चालणाऱ्या सरकारी संस्थांमध्ये विकसित झालेल्या लासीतून एका खासगी कंपनीने नफा कमविणे हे नैतिक नाही.

सध्या राज्यात लसींच्या किमतीची चर्चा सुरु आहे. त्यातच लसीकरणाचा खर्च राज्य सरकारने उचालावा असे केंद्र सरकारने सांगितले आहे. महागडी लस खरेदीमुळे राज्याची आर्थिक गणिते बिघडू शकतात असे मांडताना दोन कंपन्याच्या लशींच्या किमतीतील तफावतीवर बोट ठेवले आहे.    

Web Title: Rohit Pawar objection as to why Bharat Biotech vaccine is expensive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here