Home अहमदनगर Nagar Breaking: नगरमध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

Nagar Breaking: नगरमध्ये सात दिवसांचा कडक लॉकडाऊन

Nagar Breaking Strict lockdown in City

Nagar Breaking | नगर: नगर शहरामध्ये कोरोनाने कहरच केला आहे. दररोज सर्वाधिक रुग्ण हे नगर शहरात आढळून येतात. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने सात दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

उद्या रात्री बारा वाजेपासून ते १० मे पर्यंत कडक लॉकडाऊन असेल. यामध्ये आरोग्य सेवा सुरु राहतील तसेच दुध सकाळी ७ ते ११ या वेळेत विक्री सुरु राहील, किराणा व भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.

शेतकऱ्यांनी नगर शहरात शेतीमाल विक्रीस आणू नये अन्यता मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, जॉगिंगसाठी बाहेर पडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस उप विभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी सांगितले.  

Web Title: Nagar Breaking Strict lockdown in City

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here