Home अकोले सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन: अंकुश वाकचौरे

सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन: अंकुश वाकचौरे

Ankush Wakchaure Appeal for unopposed elections

हिवरगाव आंबरे: पक्षीय राजकारणापेक्षा गावच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व असल्याने सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन अकोले तालुका युवासेना उपाध्यक्ष अंकुश वाकचौरे यांनी सर्वपक्षिय नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

अकोले तालुक्यातील हिवरगाव आबंरे ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. निवडणूकीनंतर वैयक्तिक हेवेदावे कायमस्वरुपी टिकून राहतात. याचे गावच्या विकासावर गंभीर परिणाम होतात. हिवरगाव आबंरे गावचा इतिहास आणि राजकीय पार्श्वभुमी वेगळी असल्याने आता सर्वांनी एकजुट दाखविणे गरजेचे आहे.

हिवरगाव आबंरे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि इतरही राजकीय पक्षांची गाव, तालुका  काम करणारी नेतेमंडळी आहेत. सर्वांनी या विषयावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. अनेकांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा असली तरी तरुण, सुशिक्षित आणि प्रशासनाचा अनुभव असणारे सदस्य ग्रामपंचायतमध्ये हवेत. गावच्या विकासाचा दृष्टीकोन आणि समाजासाठी वेळ देणा-यांचीच खरी गरज ग्रामपंचायमध्ये आहे.

पंचायतराज व्यवस्था भक्कम झाल्याने अधिकाधिक निधी थेट ग्रामपंचायतमध्ये वर्ग होतो. सर्वांनी एकोप्याने काम केल्यास गाव स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. सर्वपक्षिय नेते-कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करणार असून निदान गावच्या विकासासाठी तरी एक व्हा असे आवाहन करणार असल्याचेही अंकुश वाकचौरे म्हणाले. सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणूकीनंतर जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाचे यानिमित्त सर्वांनी आभार मानायला हवेत.यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीतील घोडेबाजार थांबण्यास मदत होईल. शिवाय ठराविक प्रभाग आणि उमेदवारावर लक्ष केंद्रित होण्यास पायबंद बसेल.

अंकुश वाकचौरे, अकोले तालुका युवासेना उपाध्यक्ष 

Web Title: Ankush Wakchaure Appeal for unopposed elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here