संगमनेरात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरालगत राहणेमळा या ठिकाणी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष श्रीरंग शेळके रा. चैतन्यनगर ता. संगमनेर असे या मयत तरुणाचे नाव आहे. संतोष हा कुटुंबसमवेत चैतन्यनगर येथे राहत होता. तो बुधवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घरातून निघून गेला. गुरुवारी रात्री राहणेमळा या ठिकाणी मारुती मंदिर येथे अज्ञात वाहनाने संतोषला जोराची धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विश्वास रतन मुतडक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक खाडे हे करीत आहेत.
Web Title: Sangamner Young man killed in collision with an unknown vehicle