संगमनेर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी अटकेत
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील डोळसणे शिवारातील एका पुलाखाली अंधाराचा फायदा घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घारगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे.
पोलिसांनी यांच्याकडून एक वाहन व हत्यारे जप्त केली आहे. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे परिसरात पोलीस वाहनातून गस्त घालत होते. त्याचदरम्यान निरीक्षक सुनील पाटील यांना गुप्त खबर्याकडून दरोडेखोरांची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक डोळसणे शिवारात पोहोचले आणि तिघांना पकडले. त्यावेळी दोघे जण पळून जात असताना पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी या टोळीकडून पिकअप व लोखंडी पक्कड, मिरची पूड, पहार आदी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक हरिश्चंद्र बांडे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून संतोष बाळू वाळे वय २०, संतोष जालिंदर गुरुकुले, श्याम रामकृष्ण मोरे, तिघेही रा. झोळे ता. संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
Web Title: Sangamner taluka Gang arrested for plotting a robbery