Home संगमनेर संगमनेर पोलिसांवर हल्ला: १८ आरोपींची ओळख पटली, तिघे ताब्यात

संगमनेर पोलिसांवर हल्ला: १८ आरोपींची ओळख पटली, तिघे ताब्यात

Attack on Sangamner police 18 accused identified

संगमनेर: गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर (Sangamner Police) जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी तीन बत्ती येथे घडली. याप्रकरणी सहा निष्पन्न आरोपीसह १० ते १५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.  

या घटनेतील १८ आरोपींची ओळख पटली असून शुक्रवारी रात्री तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ला व दगडफेक झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी पहाटेपर्यंत सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. पोलिसांनी आरोपींच्या घरी जाऊन त्यांचा शोध घेतला. दिल्ली नाका येथील सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले आहे. १८ आरोपींची ओळख पटली असून लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे.

पोलिसांवर झालेल्या विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी निषेध नोंदविला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदने देण्यात आली. हल्ला करणाऱ्या समाजकंठकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Attack on Sangamner police 18 accused identified

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here