Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात बाधितांच्या आकड्याबरोबर मृत्यूचे प्रमाण वाढतेच

अहमदनगर जिल्ह्यात बाधितांच्या आकड्याबरोबर मृत्यूचे प्रमाण वाढतेच

Ahmednagar Corona patient increased also death rate

अहमदनगर: जिल्ह्यात शुक्रवारी ३८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या एकूण संख्या १ लाख ७३ हजार १०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५४ इतके झाले आहे.

बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. शुक्रवारी ४५९४ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २७००९ इतकी झाली आहे. जिल्ह्यात २४ तासांत ५६ जणांचे मूत्यू झाले आहे. हे प्रमाण देखील वाढतेच आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यू २२६२ इतके झाले आहे.  

जिल्ह्यातील शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेले रुग्णांमध्ये मनपा ६४०, अकोले १४९, जामखेड १७४, कर्जत १०९, कोपरगाव २६९, नगर ग्रामीण ४००, नेवासा १५४, पारनेर २२३, पाथर्डी ५५, राहता २७६, राहुरी २८२, संगमनेर ३४९, शेवगाव १६२, श्रीगोंदा २९७, श्रीरामपूर १७०, कॅन्टोन्मेंट ७८, मिलिटरी हॉस्पिटल २५ तर इतर जिल्ह्यातील ३९, इतर राज्यातील ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar Corona patient increased also death rate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here