Home अहमदनगर दरोडा टाकणारी एवन  हैवान काळेंची टोळी अटकेत

दरोडा टाकणारी एवन  हैवान काळेंची टोळी अटकेत

Karjat Robber Avon Haiwan arrested 

अहमदनगर | Karjat: कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील मीना सर्जेराव महारनवर यांच्या घरी ५ मे रोजी दरोडा टाकत मारहाण करून ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. या घटनेनंतर कर्जत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडेखोरांचा शोध घेऊन अटक केली आहे.

टोळीप्रमुख एवन हैवान काळे, मनीषा एवन काळे, कांचन एवन काळे सर्व रा. चिखली आष्टी जि. बीड, रेखा जनार्दन काळेसह एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

आरोपी एवन काळे विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपींकडून एकूण २० लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  

Web Title: Karjat Robber Avon Haiwan arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here