Home अहमदनगर वाळू तस्काराच्या डंपरने पोलीसांच्या गाडीस धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न

वाळू तस्काराच्या डंपरने पोलीसांच्या गाडीस धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न

Ahmednagar, Shevgaon: वाळू तस्करांकडून (sand smuggler) गस्तीवरील पोलिसांना मारण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या वाहनाला डंपरची धडक, मुरमी शिवारातील घटना, वाळू तस्करांची मुजोरी वाढली, शेवगाव पोलिसांनी दोघांना अटक केली.  

attempt was made to kill a police car by hitting a sand smuggler's dumper

शेवगाव: शेवगावचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तालुक्यातील लाडजळगाव परिसरात गस्त घालत असतांना रस्त्यावर उभे असलेले पोलीसांचे खाजगी वाहन वाळु तस्करी करणार्‍या डंपरने जोराची थडक देवून उडवल्याचा प्रकार आज (दि.22) पहाटेच्या सुमारास घडला. या वाहनाजवळ उभ्या असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी बाजुला झाल्याने वाचले. या प्रकरणी डंपर चालक व इतरांवर जीवे मारण्याच्या कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किशोर शहादेव पवार, बाळासाहेब उर्फ बाळू शहादेव पवार, हनुमान शहादेव पवार यासह इतर चौघे सर्व (रा. गुळज ता. गेवराई) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल, पो.काँ. बप्पासाहेब धाकतोडे, राहुल खेडकर, चालक होमगार्ड जमीर शेख यांचे पथक खाजगी वाहनाने (क्रमांक एम.एच. 16 सी.वाय – 7927) आज पहाटे 2 ते 5 च्या दरम्यान बीड सरहद्दीवरील सुकळी फाटा ते लाडजळगाव रस्त्यावर मुरमी गावच्या शिवारात तपासणी करत होते.

यावेळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दहा टायर हायवा (क्रमांक एम.एच 23 ए.यु 1975) हे भरधाव वेगाने आले. त्यास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने ते न थांबवता उभ्या असलेल्या कर्मचार्‍यांच्या अंगावर घालून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. तर उभ्या असलेल्या पोलीसांच्या गाडीस मागील बाजूस धडक देवून भरधाव वेगाने निघुन गेला. त्यानंतर त्या वाहनाचा पाठलाग करत असताना काळ्या रंगाच्या स्कार्पिओ वाहन चालकाने व दुचाकीवर आलेल्या व्यक्तींनी वेळोवेळी अडथळा निर्माण करुन हायवा चालक व वाहनास पळून जाण्यास मदत केली.

सदरील वाहन किशोर पवार यांच्या मालकीचे असून ते अवैध वाळू तस्करीसाठी बाळू पवार, हनुमान पवार यांच्या मदतीने चालवून बोलेरो वाहन टेहळणी करण्यासाठी वापरत असल्याचे समजले. चकलांबा ता. गेवराई पोलीसांच्या मदतीने पाहणी केली असता गुळज येथे पवार यांच्या घऱासमोर वाळू वाहतुक करणारे वाहन आढळून आले. मात्र पोलीस आल्याचे कळल्याने सर्वजण पळून गेले. संशयितांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे अधिक तपास करीत आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Suicide of lovers in gadmandir area of ramtek

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here