Home अहमदनगर अहमदनगर: भर रस्त्यात तरुणीचा हात धरून विनयभंग, सेल्फी व्हायरल करण्याची धमकी

अहमदनगर: भर रस्त्यात तरुणीचा हात धरून विनयभंग, सेल्फी व्हायरल करण्याची धमकी

Ahmednagar Young Women Molested: माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझे दुसऱ्याशीही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी.

molested a girl by holding her hand in the street

अहमदनगर : भर रस्त्यात दुचाकी आडवी उभी करून तू माझ्याशी लग्न कर, नाही तर सेल्फी फोटो व्हायरल करीन,  तुझे दुसऱ्याशीही लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मंगळवारी ही घटना आहे.

याप्रकरणी विष्णू सुनील शर्मा (रा. इंद्रा कॉलनी, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला तारकपूर, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तरुणी

याबाबत तरुणीने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाजीपाला आणण्यासाठी गेली असता पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एकाने तरुणीचा हात धरला व माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्यासोबत लग्न कर, असे म्हणाला. त्यावर तुझे नाव वडिलांना सांगेन, माझा हात सोड, असे तरुणीने सुनावले. त्यामुळे तरुणाला राग आला. त्याने तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझे दुसऱ्याशीही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. भर रस्त्यात घडलेल्या प्रकारामुळे तरुणी घाबरली. तिने तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. यावरून विष्णू सुनील शर्मा याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: molested a girl by holding her hand in the street

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here