Home अकोले अकोलेतील घटना: मायलेकींचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू, आईचा मृतदेह सापडला मात्र…

अकोलेतील घटना: मायलेकींचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू, आईचा मृतदेह सापडला मात्र…

अकोले: अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील दुर्दैवी घटना घडली.  पाण्यात बुडून (Drowned) आई व तीन वर्षे वयाच्या चिमुरडीचा समावेश आहे. आईंचा मृतदेह सापडला मात्र मुलीचा मृतदेह अद्याप आढळून आला नाही.  

Akole Mileki drowned in Pravara River news

अकोले: प्रवरा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील म्हाळादेवी येथे गुरुवारी दुपारी घडली आहे.  यामधील आईचा मृतदेह सापडला मात्र तीन वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत सापडलेला नव्हता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पूनम किरण भोसले (वय २७, रा. कोल्हार खु.) व आर्या किरण भोसले (वय ३) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत म्हाळादेवीचे पोलिस पाटील अशोक कचरू संगारे यांनी अकोले पोलीस ठाण्यात खबर दिली. यांच्या खबरीवरून रात्री उशिरा अकोले पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पूनम या माहेरी आपले वडील नारायण महादू संगारे यांच्याकडे म्हाळादेवीला आल्या होत्या. दुपारी पूनम व त्यांची मुलगी आर्या कपडे स्मशानभूमीलगत असलेल्या धोबी घाटावर गेल्या होत्या. वडील नारायण हे अकोले येथे आठवडे बाजारात गेले होते. ते दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर लेक व नात घरी नसल्याने त्यांनी शोधाशोध केली. धोबी घाटावर या मायलेकींच्या चपला व धुण्यासाठी आणलेले कपडे दिसले. गावकऱ्यांनी शोध घेतला असता, पूनम यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणला. आर्या हिचा मृतदेह अद्याप सापडला नाही. रात्री साडेनऊ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Akole Mileki drowned in Pravara River

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here