Home क्राईम धक्कादायक: गर्भपात कर मग आपण लग्न करु, मुलीचा गर्भपात केला अन

धक्कादायक: गर्भपात कर मग आपण लग्न करु, मुलीचा गर्भपात केला अन

Aurangabad Crime Case Have an abortion then we will get married

Aurangabad Crime Case | औरंगाबाद: वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार (Sexually abuse) करून तिचा गर्भपात (abortion) करण्यास भाग पाडून लग्नास नकार दिल्याने आरोपी विरुद्ध शिऊर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चरण रूपसिंग सुलाने असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील साळेगाव येथील चरण सुलाने हा मागील दोन वर्षापासून २१ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करत असे.  त्याचबरोबर माझ्या मोबाईलमधील फोटो-व्हिडीओ आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली अन त्यानंतर गर्भपात कर मग आपण लग्न करु असं म्हणत आरोपीने मुलीचा गर्भपात केला. याबाबतची सर्व माहिती मुलीच्या घरच्यांना समजली.

त्यानंतर  मुलीकडची नातेवाईक त्याच्या घरी मुलीबाबत बोलणी करण्यासाठी गेले असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर मोठा विश्वास ठेवूनही धोका देणाऱ्या चरण सुलाने यांच्याविरोधात मुलीने शिऊर पोलिसांत तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Aurangabad Crime Case Have an abortion then we will get married

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here