Home महाराष्ट्र पती पत्नी व लेक पाण्यात बुडाले, पत्नी व लेकीचा मृत्यू, पती बचावला...

पती पत्नी व लेक पाण्यात बुडाले, पत्नी व लेकीचा मृत्यू, पती बचावला अन नातेवाईकांचा वेगळाच संशय

Husband and wife drowned Death of wife and Leki, husband rescued 

अमरावती: जिल्ह्यातील दर्यापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या घुंगशी बेरीज प्रकल्पात माय लेकीचा पाण्यात बुडून  (Drawned) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आराध्या गौरव तायडे (३ वर्षे), प्रिया गौरव तायडे (वय२४), असे मयत मायलेकीचे नाव आहे. गौरव सुरेश तायडे (वय ३०) हे प्रकल्पावरील कार्यरत शिपायाच्या मदतीने बचावले आहेत.

गौरव तायडे हे मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील रहिवाशी असून खासगी काम करतात. त्यांचे चार वर्षांपूर्वी मयत प्रियासोबत लग्न झाले होते. शुक्रवारी तिघेही दर्यापूर तालुक्यातील धामोडी येथे तेरावीच्या कार्यक्रमाकरिता एका नातेवाइकांकडे आले होते. तेथे दोन दिवस मुक्काम केला अन ते आपल्या कुटुंबासह रविवारी दुचाकीने गावी पारद येथे जाण्याकरिता निघाले होते.

दरम्यान, धामोडी गावाबाहेर दीड किमी अंतरावर पूर्णा नदीवरील घुंगशी बॅरेज प्रकल्प आहे. तेथे असलेल्या काही शेतकऱ्यांना कुणीतरी पाण्यामध्ये बुडत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी आरडाओरड करीत प्रकल्पाकडे धाव घेतली. यावेळी प्रकल्पावर असलेल्या चौकीदाराने घटनास्थळी धाव घेत  बुडत असलेल्या गौरवला दोराच्या सहाय्याने वर काढले. मात्र, मायलेकीला वाचवण्यात यश आले नाही. यावेळी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली. त्यानंतर बचाव पथकाच्या चमूच्या सहकार्याने मायलेकींचा मृतदेह प्रकल्पातून बाहेर काढण्यात आला आहे. यामधील वाचलेल्या गौरव वर मूर्तिजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर घटनेत बचावलेल्या गौरव तायडेला अटक का करण्यात आली नाही असे म्हणत मुलीकडच्या नातेवाइकांनी प्रचंड गोंधळ करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Husband and wife drowned Death of wife and Leki, husband rescued 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here