Home अहमदनगर तुम्‍ही खाल्ल्या मिठाला जागत नाहीत म्‍हणून…सुजय विखेंचा टोला

तुम्‍ही खाल्ल्या मिठाला जागत नाहीत म्‍हणून…सुजय विखेंचा टोला

You don't even wake up to the salt you ate Sujay Vikhe Patil

Ahmednagar | अहमदनगर: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil )आणि राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यात वाकयुद्ध रंगले होते. त्याचे पडसाद आता मतदारसंघातही उमटत आहेत. विखेंच्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी खाल्ल्या मिठाला जागण्याची आमची संस्कृती आहे, असे सुनावले होते.

नगर मध्ये एका कार्यक्रमात डॉ. विखे पाटील म्हणाले की , ‘गोरगरीबांच्‍या मिठाला आम्‍ही जागतो. म्‍हणूनच सामान्‍य माणूस आमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्‍याची पावती मोठ्या मताधिक्‍याच्‍या रूपाने आम्‍हाला मिळते. संसदेमध्‍ये सामान्‍य माणसाचीच बाजू आपण प्रामाणिकपणे मांडतो. यावर कोण काय बोलतंय, याला मी फारसे महत्त्व देत नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून सामान्‍य माणसासाठी काम करण्‍याची परंपरा अखंडपणे सुरू आहे. सामान्‍य माणसाच्‍या खाल्ल्या मिठाला आम्‍ही जागत असल्‍यामुळेच जनता आमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे. प्रत्येक सामान्‍य माणसाला विखे पाटील कुटुंबीयांचा आधार वाटतो. परंतु, तुम्‍ही खाल्ल्या मिठाला जागत नाहीत. म्‍हणून नगर दक्षिणमध्‍ये तुम्‍हाला पराभव स्वीकारावा लागला, असा टोलाही डॉ. विखे यांनी लगावला. सुजय विखे यांनी नाव न घेता टोला लगाविला आहे

मागील लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्यावरून विखे आणि पवार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. अखेर विखे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विखे यांनी राष्ट्रवादीचा पराभव केला होता. त्याच अनुषंगाने विखे यांनी वक्तव्य केले आहे.

Web Title: You don’t even wake up to the salt you ate Sujay Vikhe Patil

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here