Home अहमदनगर नगरच्या तरूणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरूणाला मुंबईतून अटक

नगरच्या तरूणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरूणाला मुंबईतून अटक

Arrested from Mumbai for repeatedly sexually abuse a city girl

Ahmednagar | अहमदनगर : नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार (sexual abuse) करणाऱ्या तरूणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी वडाळा पूर्व (मुंबई)  येथून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणीवर राहील अन्सारी याने वडाळा (मुंबई) येथे व नगर शहरामध्ये वारंवार अत्याचार केला होता. तसेच राहील याच्या नातेवाईकांनी तरूणीला धमकी दिली होती.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून तरूणासह नातेवाईक मुसा अन्सारी, झेनाब अन्सारी, रझिया अन्सारी, साहील अन्सारी (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. म्हाडा कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा आय मॅक्स, मुंबई) अत्याचार, अॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहील मोबीन अन्सारी (रा. म्हाडा कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा आय मॅक्स, मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, पोलीस अंमलदार डोळे, म्हस्के, महिला पोलीस अंमलदार येणारे यांच्या पथकाने मुंबई येथून आरोपी राहील अन्सारी याला अटक केली.त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी वडाळा (मुंबई) येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे करीत आहेत.

Web Title: Arrested from Mumbai for repeatedly sexually abuse a city girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here