Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पडक्या घरात अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर ब्रेकिंग: पडक्या घरात अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Nevasa Suicide by strangulation of a minor girl

Ahmednagar Nevasa| Sonai | सोनई:  अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवंडी रस्त्यापासून जवळच असलेल्या छत्रपती चौक परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.

नम्रता शिवा शिंदे (वय-15) असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना समोर आली असून याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची माहिती सोनई पोलीस ठाण्यास देण्यात आली. नम्रता हिने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही. रविवारी सायंकाळी बघ्यांची एकच गर्दी जमली होती. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तपास हेड कॉन्स्टेबल एच. एम. गर्जे करत आहेत.

Web Title: Nevasa Suicide by strangulation of a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here