युवती बोलत नसल्याच्या रागातून तरुणाने तिच्यावर केला प्राणघातक हल्ला
पुणे | Pune Crime: दांडिया खेळत असताना झालेल्या ओळखीतून मुलगी बोलत नसल्याच्या रागातून एका तरुणाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच आरोपीला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
आरोपी ज्ञानेश्वर निंबाळकर हा २२ वर्षीय तरुण पुण्यातील चंदननगर येथील संघर्ष चौकाजवळ राहत असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ज्या मुलींवर हल्ला झाला ती मुलगी अल्पवयीन आहे.. पुण्यामध्ये काही महिन्याअगोदर दांडियामध्ये या दोघांची ओळख झाली होती. मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला या तरुणाशी बोलण्यास, संपर्कात राहण्यास मज्जाव केला होता. यानंतर या मुलीने या मुलाशी बोलणे सोडून दिले होते. अचानकपणे युवतीने बोलणे सोडून दिल्याने आरोपीस संताप आल्याने त्याने रागाच्या भरामध्ये आरोपीने युवतीवर धारदार चाकूने वार केले.
या हल्ल्लात अल्पवयीन मुलगी जखमी झाली. युवतीवर हल्ला झाल्यावर आरोपी शहरातून पळ काढण्याच्या तयारीत असताना अखेर विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विमानतळ पोलिसांनी लोहगाव फॉरेस्ट पार्कमधून त्यास अटक केली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Title: Pune Crime Angered that the girl was not speaking, the young man attacked knife