बापरे! तीन हजारांसाठी केला पत्नीचा सौदा …. वेश्या व्यवसाय करण्यास…
Pune Crime: पैशांसाठी पत्नीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (prostitution business) करण्यास लावणे आणि ३ हजार रुपयांसाठी मित्रांच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
पुणे: पैशांसाठी पत्नीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास लावणे आणि ३ हजार रुपयांसाठी मित्रांच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २५ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी पतीसह आदित्य गौतम (रा. कसबा पेठ), सुजित पुजारी (रा. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार हांडेवाडी रोडवर डिसेंबर २०२० पासून मे २०२२ दरम्यान होत होता. फिर्यादीच्या पतीला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने तिला मारहाण करून उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करून वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले. तसेच त्यांच्या दोन मित्रांकडून प्रत्येकी ३ हजार रूपये घेऊन त्यांच्याबरोबर संग करायला लावले.
Web Title: Bargained wife for three thousand to engage in the prostitution business
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App