Home क्राईम ‘न्यूड चॅटिंग’ महिलेला पडली महागात,  सर्व मर्यादा तोडत…

‘न्यूड चॅटिंग’ महिलेला पडली महागात,  सर्व मर्यादा तोडत…

Nagpur: अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल (Nude chatting’) घेऊन त्यावर सर्व मर्यादा तोडत बोलण्याची चूक एका महिलेला दीड लाखांना पडली.

'Nude chatting' cost the woman dearly, breaking all limits

नागपूर: अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल घेऊन त्यावर सर्व मर्यादा तोडत बोलण्याची चूक एका महिलेला दीड लाखांना पडली. महिलेची फसवणूक झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला.

दोन मुलांना घेऊन सासरी राहणाऱ्या तिशीच्या आतील महिला धुणीभांडी करून गुजराण करते. फेसबुकवर तिची राहुल खन्ना याच्यासोबत ओळख झाली. त्याने यूकेमधील व्यावसायिक असल्याची थाप देत तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. महिला त्याच्या बोलण्याला भुलली. त्यानंतर एका क्षणी दोघांनीही ‘न्यूड चॅटिंग केली.

त्याने तिचा व्हिडीओ बनवला. तिला दोन लाख डॉलर्स व काही दागिने गिफ्ट म्हणून पाठवीत असल्याचे सांगितले. या वस्तू मार्चअखेरीस मुंबईत पोहोचल्याचेही सांगत त्याने डिलिव्हरी बॉयचा क्रमांकही दिला. डिलिव्हरी बॉयने विविध शुल्काच्या नावाखाली महिलेकडून दीड लाख रुपये वेळोवेळी घेतले. महिलेने राहुलला विचारणा केली असता त्याने व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. फसवणूक लक्षात येताच महिलेने हाताची नस कापत आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ती बचावली.

Web Title: ‘Nude chatting’ cost the woman dearly, breaking all limits

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here