Home बीड टायर फुटला अन् शिवशाहीने पेट घेतला, संपूर्ण बस जळून खाक

टायर फुटला अन् शिवशाहीने पेट घेतला, संपूर्ण बस जळून खाक

Beed News: एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग (Fire) लागल्याची घटना.

Beed tire burst and Shivshahi caught fire, burning the entire bus

बीड: शिवशाही बसने अनेक वेळा पेट घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संपूर्ण बस जळून खाक झाली आहे.

लातूरहून परभणीकडे जाणारी ही बस परळी शहरात दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली आणि यावेळी बसचे टायर फुटले आणि बसला भीषण आग लागली. या एसटीमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने वेळीच मोठा अनर्थ टळला.

लातूरहून परळीकडे निघालेल्या शिवशाही बसने परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच  काहीतरी वाजल्याचा आवाज मोठा झाला. मात्र, यावेळेस या शिवशाहीच्या चालकाला आपल्याच गाडीच्या टायरचा हा आवाज असल्याचं जाणवलं. यावेळेस तात्काळ त्यांनी गाडी साईडला करत गाडीचा अंदाज घेतला, त्यावेळेस गाडीचा टायर फुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर या गाडीच्या टायरने पेट घेतला. मात्र, गाडीने पेट घेताच काही क्षणात पेट वाढत चालल्याने चालकाच्या समय सूचकतेमुळे या गाडीतील प्रवासी हे सुखरूप बाहेर पडले.

मात्र, या सगळ्या घटनेमध्ये शिवशाही गाडीची पूर्णपणे राख झाली आहे. मात्र, हा सगळा प्रकार घडत असताना तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत हा सगळा प्रकार बघत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करत या सगळ्या गोष्टीची माहिती दिली. त्यावेळेस तात्काळ या ठिकाणी अग्निशामक दलाच्या एक गाडी पोहोचले. मात्र, आगीने रुद्र अवतार घेतल्याने ही शिवशाही बसला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल अग्निशामक दलाच्या तीन गाड्या या बोलाविण्यात आल्या. काही तासानंतर या आगीवर नियंत्रण करण्यात आले.

Web Title: Beed tire burst and Shivshahi caught fire, burning the entire bus

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here